Uddhav Thackeray Speech :  शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता गोल्फ मैदानातील जाहीर सभेने  झाली.यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. पंतप्रधान मोदी यांचे हिंदुत्व मान्य नसल्याचे सांगत एक निशाण म्हणजे तिरंगाच असेल भाजपचं फडकं नसेल अशी थेट आव्हानाची भाषा उद्धव यांनी केली. 


नाशिक येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :


- सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल.


- राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेब ठाकरे यांची सगळ्यांनाच आठवण झाली. त्यावेळी इतर कोणीही बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेतली नव्हती.


- अनेक नेत्यांनी पळपुटी भूमिका घेतली.धर्माची शिकवण देण्याऱ्या शंकराचार्यांना भेटण्याची तसदी नाही. रामनवमी पर्यंत का थांबले नाही, एवढी कसली घाई झाली.


- भाजपकडून महाराष्ट्र लुटला जात आहे, ओरबडला जातोय. मिंध्ये तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि दिल्ली समोर शेपूट हलवत आहे.


- भाजप म्हणजे  भेकड जनता पार्टी आहे. 


-  जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. 


- महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे  नुकसान झाले. तेव्हा राज्य सरकारने मागणी करून ही निधी दिला नाही. पण, गुजरातला न मागताही निधी दिला. 


- हिंदूमध्ये विष पेरतात.भेदभाव करतात. देशासाठी 'मन की बात' गुजरातसाठी 'धन की बात' करता अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला. 


- मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत. मोदी हे योग्य नाही, असलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. 


- माझ्याकडे कार्यकर्ते पळणारे नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी घालतात.घर कार्यकर्त्यांचे आणि त्यामध्ये हे अधिकारी तंगड्या पसरून बसतात.आमचे सरकार आल्यावर ह्याच तंगड्या गळ्यात घालणार. 


- भाजपला एक देश, एक निशाण, एक विधान हवंय. पण भाजपला आम्ही सांगून ठेवतोय एक निशाण म्हणजे तिरंगाच असेल, भाजपचं फडकं नसले. एक विधान म्हणजे बाबासाहेबाचं संविधानच असेल आणि एक प्रधान म्हणजे जनता निवडून देईल तोच असेल.  


- हनुमान रामाच्या नावावर मत मागतात. मग 10 वर्ष काय केले, देशाला काय दिले घंटा 


- आता, राम भरोसे बस झाले, आता काम भरोसे मते मागा


- भाजपकडे पर्याय काय, त्यांना मोदी शिवाय पर्याय नाही, त्यांना रामाची मदत घ्यावी लागत आहे.