Uddhav Thackeray Shiv sena : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचा मुलगा भुषण देसाई शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. भुषण देसाई यांचा आजच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उभ्या शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 40 आमदार आणि 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात त्यानंतर सत्तांतर झाले. शिवसेना कुणाची यावरुन सध्या कोर्टात वादविवाद सुरु आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनाला दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यातच त्यांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण ( Bhushan Desai) हा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण देसाई आजच बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी देखील शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे तर उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हाने अधिक खडतर होताना दिसत आहे.
बापलेकाची जोडी शिंदे गटात जाणार ?
भूषण देसाई यांच्यानंतर आता सुभाष देसाई शिंदे गटात प्रवेश करणार का? याची चर्चा रंगली आहे.
भूषण देसाईंवर भाजपचे आरोप -
चार महिन्याखाली भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते.