सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक ( Vaibhav Naik) यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून (Sindhudurg District Chief) उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आपल्याकडे पक्षवाढीचं काम दिल्यामुळे जिल्हाप्रमुख पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. 


वैभव नाईक यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केलीय. " नव्याने नियुक्त केलेले तिन्ही जिल्हाप्रमुख आधीचे राणे समर्थक असून ठाकरे गटाकडे निष्ठावंतांना डावलून राणे समर्थकाना दिली जातात, अशी टीका केली जात आहे.   


येत्या दोन महिन्यात नारायण राणेंच मंत्रिपद जाणार : आमदार वैभव नाईक 


आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय. "आतापर्यंत इतर राजकीय पक्षांचं अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही, त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी केलाय. 


"नितेश राणे यांनी आपल्या वडिलांना विचारावं की इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं काय झालं. वडिलांनी नेमका कोणता समजोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकर यांना निवडून आणू या नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही वैभव नाईक यांनी समाचार घेतला. "नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे दीपक केसरकर यांना ड्रायवर ठेवणार असल्याचे सांगतात तर नितेश राणे  केसरकरांना निवडून आणणार असे सांगतात. या दोन्ही बंधूंनी एकत्र बसून आपल्या वडिलांना विचारावं की आपण केसरकरांचं काय करूया? असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी यावेळी केला.  


महत्वाच्या बातम्या 


धुळ्याच्या क्षितिजने केले जी 20 च्या युवा परिषदेला संबोधित,  युवा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातर्फे निवड