Uddhav Thackeray :  राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वर्तवली आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं वक्तव्य केल्याचं आशिष शेलार यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर केले आहे.


दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांच्या बैठक पार पडली. तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात,कार्यकर्त्यांपर्यंत जा.. असे आदेश बोलताना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिले आहेत. राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.  केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. 


उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला माझा कट्ट्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केल्याचं शेलार म्हणाले. दरम्यान, नेमकं कशाच्या आधारावर उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीचं भाकित केलं? मध्यावधी निवडणुका झाल्या तर सर्व पक्ष तयार आहेत का? मध्यावधी निवडणुका झाल्या तर नेमकं काय कारण अशू शकते? या सर्व प्रश्नांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


एकंकदरीत परिस्थिती पाहाता उद्धव ठाकरेंकडून पक्षाचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. जनतेमध्ये काम करणारे नेते आता पक्षात राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे राहिलेले नेतेही जाण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात जोडून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीचं वक्तव्य केले आहे, असं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले. हे सरकार टिकणार नाही, अस्थिर सरकार आहे, अशा अफवा उठवायच्या असे सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 15 आमदारांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत, असेही मस्के यावेळी म्हणाले.