मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी  देशातील  व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  नाहीत पण राज ठाकरे (Raj Thackeray)  असतील, असे वक्तव्य भाजप नेते  गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राम मंदिरावरुन ते टीका करतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलवण्याचं कारण काय?'असा सवाल देखील गिरीश महाजनांनी केला आहे. 


गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदीरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल. 


संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा : गिरीश महाजन


गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले,  घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमीका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही 20  दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहे. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.


मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही : गिरीश महाजन


 मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहे. गिरीश महाजन म्हणाले,   मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीनं काम सुरु आहे. छगन भुजबळांना विनंती केली आहे की आपापसांत भांडू नका. टीका करुन दोन समाजात तेढ निर्माण करु नका.


निमंत्रणावरुन नाराजी नाट्य?


ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्याच योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत.  ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार काही नाही अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


हे ही वाचा :


राम मंदिरात जाणारे एकमेव VIP म्हणजे मोदी, तर बाबरी पडल्यावर पळून जाणारे फडणवीस : संजय राऊत