मुंबई : राम मंदिराबद्दल (Ram Mandir)  आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या त्यांना जो इवेंट (Event)  करायचा आहे तो करू द्या. मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण आपल्या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी (PM Modi) असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच  बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)  केला आहे. 


संजय राऊत म्हणाले, राम मंदिराबद्दल आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या. त्यांना जो इव्हेंट करायचा आहे तो करू द्या. भाजपनं त्यांना भगवान विष्णुचा तेरावा अवतार घोषित केला आहे. रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार आहेत असे ऐकले आहे. मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामांचं बोट धरून मंदिरात नेत आहेत. 


छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं?  राऊतांचा सवाल


राम मंदिरावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. राम मंदिर पडल तेव्हा कुठे होते ही लोकं? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली.बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 


राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होणार : राऊत


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. याविषयी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री,  उद्या फडणवीस,अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. 


प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा वारसा जपत आहेत : राऊत


28 डिसेंबरनंतर इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णयावर संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. 24-24 हा त्यांच सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानानं सामिल करून घेऊ. मोदींचा पराभव झाला नाही तर सर्वांना जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. बाबासाहेबांचा वारसा ते जपत आहेत, त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत. 


हे ही वाचा :


Ram Mandir : चांदीची वीट घेऊन सात युवक निघाले अयोध्येला; सायकलीने करणार 1150 किलोमीटरचा प्रवास