Maha Patrakar Parishad Live Update : माझं पद अवैध होतं तर अमित शाह मातोश्रीवर का आले होते? उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे कोणते मोठे गौप्यस्फोट करणार? ही पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालय असेल सत्य ऐकून विचार करा! असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय
पार्श्वभूमी
मुंबई: 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad), उद्धव...More
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो; तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली! लोकशाहीच्या हत्याऱ्यांना माहीत नाही; महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही, तिथल्या तिथे गाडून टाकते! समजा १९९९ साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग २०१४ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं?
सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार! आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन!पण लोकशाही जिवंत रहाणार आहे की नाही? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Press Conference Today: मला सत्तेचा मोह नव्हता; एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं. राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं होतं, ते असंविधानिक होतं. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार, की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray PC : 1999 सालची घटना शेवटची असल्याचे म्हणतात, मग 2014 मध्ये माझा पाठींबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसे भोगले. मिंद्यांना पडे कुणी दिली.
Uddhav Thackeray Press Conference Today: आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलंय का?
Uddhav Thackeray Janta Darbar : जे पी नड्डा म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहणार आहे. फक्त भाजप पक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले होते आणि त्याची ही सुरवात आहे. एका पक्षाचा अध्यक्ष उघडपणे सर्व पक्ष संपवून जाणार असल्याचे सांगत आहे. हे खूप घातक असून, लोकशाहीच्या खुनाची सुरवात झाली आहे.
Uddhav Thackeray Press Conference Today: शिवसेना जर तुम्ही विकली असाल; तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे? राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना! व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत. सरकार कोणाचंही असलं तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Press Conference Live : अनेकजण म्हणाले तुम्ही राजीनामा दिला नको पाहिज होता. मला वाटलं या पदावर नको बसलं पाहिजे, मी सत्तेच्या मागे नाही. त्यामुळे राजीनामा दिला. आता हि लढाई शिवसेनेची नाही तर, जनेतची लढाई. आमचा पात्र अपात्र निर्णय जनता घेईल.
Uddhav Thackeray Press Conference Today: ही फक्त उद्धव ठाकरेंची लढाई नाही. सगळे जग पाहतेय. या देशात लोकशाही आहे की नाही? याची लढाई आहे. सुप्रीम कोर्ट की लवाद कोण मोठा? याची लढाई होणार आहे. लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व, वर्चस्व जिवंत राहणार का? याची लढाई आहे.
Uddhav Thackeray PC : निवडणूक आयोगावर केस दाखल केली पाहिजे. त्यांनी आपल्याला काम लावले होते. आम्ही पुरवलेले लाखो रुपयांचे कागदपत्रांचा काय केले आहे. गाद्या केल्या क्या त्याच्या, त्याचे पैसे आम्हाला परत द्यावे. हा मोठा घोटाळा आहे.
Uddhav Thackeray Press Conference : गेल्या आठवड्यात लबाडांनी...लवादांनी निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची आहे. जनता ठरवेल शिवसेना कुणाची आहे.
लवाद नव्हे हा तर लबाड, निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात, उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray PC : तुम्ही विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानले तर हे असैविधानक आहे. विधिमंडळ पक्षाची मुदत फक्त पाच वर्षे असते. एक राजकीय पक्ष आहे, त्या पक्षाचा नेता निवडणूक लढला नाही तर विधिमंडळ पक्ष कुठून येणार. मात्र यामुळे तो राजकीय पक्ष संपत नसतो. तो पुन्हा निवडणूक लढू शकतो.
Uddhav Thackeray PC : एक राजकीय पक्ष काय आहे?, त्या पक्षाची भूमिका त्याचे कार्यकर्ते समाजात पोहचवत असतात. हेच कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या नेत्यांची निवड करतात. तसेच, आपल्या पक्षाच्या अध्याक्षाची देखील निवड करतात. या सर्व नेत्यांची माहिती निवडणूक आयोगात दिले जाते. निवडणूक आयोगाला कोण सांगतो की हा व्यक्ती या भागातून निवडणूक लढणार असून, या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहे. एक राजकीय पक्ष हि माहिती निवडणूक आयोगाला देत असते. त्यावळी विधी मंडळ नसते. नार्वेकर यांच्या आदेशात म्हटले आहे की विधी मंडळच्या बहुसंख्य मताने ठरवेलेला नेता राजकीय पक्षाचा प्रमुख असेल. असे कसे होऊ शकते.
Uddhav Thackeray Press Conference Today: जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : 1999 च्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवर शिवसेनेची कोणतीही घटना नाही. त्यामुळे 1999 ची घटना तुमची शेवटची घटना आहे. त्या घटनेत सर्वोच्च अधिकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होते. त्यानंतर अधिकार कुणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही. आता बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे, असे समजून पक्ष आणि चिन्ह काढून घेतली. निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावर्ती आपल्या निकालात केली आहे. निवडणूक आयोगात केस सुरु होती, त्यावेळी निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागतल्या, त्याची पूर्तता आम्ही केली. त्यांचा खोटेपणा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा... कारण, सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यामुळे लोकांना काय झालं ते लोकांना समजून सांगावे लागेल. असे म्हणत अनिल परब यांनी सर्व पुरावे दाखवले.
Uddhav Thackeray Press Conference Live : अपात्रतेचे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेले नव्हते. या प्रकरणात आधी सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेले आहेत, ते बघितले पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे. तो विचार राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी होती. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे लीडर म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता दिली. त्यांचा तो निर्णय बेकायदेशीर आहे असं 123 नंबरच्या परिच्छेदमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे आहे
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आग आहे, तुम्ही आगीशी खेळलात - संजय राऊत
Uddhav Thackeray PC : कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नसून, मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या बाबतीत पाहायचं असेल, तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे. त्यांच्या सहीने रजिस्ट्रेशन झाले. त्यामुळे मूळ राजकीय पक्षाला आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळे कायद्यानुसार अधिकार आहे.
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : जर कुणाला राजकीय पक्ष सोडायचा असेल तर ते पक्ष सोडू शकतात, पण त्या आधारे ते अपात्र ठरतात. राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हिपचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, त्याचं जर पालन कुणी केलं नाही तर ते आमदार, खासदार अपात्र ठरू शकतो. कायद्यामध्ये विधीमंडळा पक्षाला महत्व नाही, कारण तो पाच वर्षांसाठी असतो. त्यामुळे राजकीय पक्ष हा महत्त्वाचा असतो.
कायद्याने दोन तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी लागू होत नाही. पण एकनाथ शिंदे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त 16 आमदार होते. त्यानंतर त्यांनी कारवाईची भीती दाखवून अनेकांना आपल्याकडे घेतलं. पण त्या आधी त्यांच्याकडे कमी आमदार असल्याने ते पक्षांतर बंदी कायद्याने अपात्र ठरतात. विधानसभेच्या अपात्रतेच्या संदर्भात विधाससभेच्या अध्यक्षासमोर झाली पाहिजे असा कायदा सांगतो.
राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विश्वासघात केला. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. विधीमंडळ पक्ष हा व्हिप नियुक्त करू शकत नाही, मूळ राजकीय पक्षच व्हिप नियुक्त करू शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी नेमलेला व्हिप, त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं.
Uddhav Thackeray Press Conference Today: संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होते. राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावी लागू नये, विश्वासहर्ता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाचे एकनिष्ठ असली पाहिजे, त्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहीला. पक्षानंतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला. त्याच्या मधील परिच्छेद वन बी वन, ए वन बी हे दोन अत्यंत महत्त्वाचे पार्ट आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय?, विधिमंडळ पक्ष आमदार झालेला वीस वर्षाचा असतो. कारण की पाच वर्षानंतर ते लोक बदलतील. काहीजण पुन्हा निवडून दिले, पण नवीन विधिमंडळ पक्ष तयारी अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे. म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही.
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड करताना अॅड. असिम सरोदे म्हणाले की, आपण अपात्रतेबद्दलचा सुनावणीचा कायदा, त्याबद्दल झालेल्या न्याय आणि अन्याय याचे विश्लेषण करण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्याबद्दल कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. सध्या जी कायदेविरोधी प्रवृत्ती ही तयार होत आहे. 10 जानेवारी 2024 चा निर्णय हा लक्षात घेणे याचा विश्लेषण करणे आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर या निर्णयाची चिरफाड करणे हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकतो.
Uddhav Thackeray Press Conference Live : सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे. त्याला माहिती झाले आहे की, पक्षांतर बंदी कायदा काय आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांना पळवून लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे. कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले.
Uddhav Thackeray Press Conference Live : अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दहा व परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात, तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की, तुम्ही वकील आहेत. तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका तुम्हाला बोलायचं असेल तर न्यायालयानत बोला असे सांगतात. त्यामुळे त्याचे उत्तरआधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे. आपण सगळेजण नागरिक आणि मतदार आहोत. आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणं सुद्धा एक राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की, प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणाबद्दल बोलले पाहिजे.
Uddhav Thackeray PC : 10 जानेवारी 2024 चा निर्णय हा लक्षात घेणे आणि याचा विश्लेषण करणे आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल, तर निर्णयाची चिरफाड करणे हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकतो असे असीम सरोदे म्हणाले.
Uddhav Thackeray Press Conference Live : पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे असे असीम सरोदे म्हणाले.
Maha Patrakar Parishad Live Update : न्यायालयामध्ये बेईमानांना न्याय मिळाला तर उद्या न्यायालयात कुणी जाणार नाही. त्यामुळे जनता न्यायालय आज इथं उभे केलेय. मला खात्री आहे, या न्यायालयात जनता जो निर्णय देईल, तोच निकाल चार महिन्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या न्यायालयाचे स्वरुप सुटसुटीत आहे. नक्की या खटल्याचे स्वरुप काय होते... शिवसेनेने कसा खटला लढला.. सत्य आमच्या बाजूने असताना त्याची हत्या झाली, असे संजय राऊत म्हणाले.
Uddhav Thackeray Press Conference Live : कायदा लोकांसाठी असल्यास जनतेमध्ये बोलले पाहिजे असे म्हणत असीम सरोदे यांच्याकडून राहुल नार्वेकर यांनी निकालावर बोलायला सुरवात केली आहे.
Maha Patrakar Parishad Live Update : कर नाही त्याला डर कशाला, असे या राज्याचे मिंदे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत सांगत असतात. बरोबर आहे, त्यामुळेच कर नाही, डर नाही.. त्यामुळेच जनता न्यायालय घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे. आमच्यामध्ये हिंमत आहे. आमच्याकडून काहीच चुकीच झालेले नाही. कायद्याचे पालन केलेय. न्यायालयात उत्तम लढाई लढली. न्यायालयाने नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि नेत्यांनी उत्तम लढा दिला. इमानदारीने लढलो. तुम्ही बेईमानाने जिंकलात, त्याविरोधात हे जनता दरबार आहे. इमानदारी किसी कायदे और कानून की मोहताच नही होती... आम्ही इमानदार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
Maha Patrakar Parishad Live Update : संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल नार्वेकर यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्याच्या हातात दिली. ही शिवसेना तुमची असे जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्र खदखदतोय... नार्वेकरांनी दिलेला निर्णय त्यांच्या पत्नीलाही मान्य नसेल.
राहुल नार्वेकर हे लवाद म्हणून काम करत होते, त्यांच्या निकालानंतर त्यांच्या अंत्ययात्रा निघाल्या, त्यांना तिरडीवर घालण्यात आलं, हे महाराष्ट्रात कधीही घडलं नाही, या लवादाचा निकाल राहुल नार्वेकरांची बायकोही मान्य करणार नाही
Maha Patrakar Parishad Live Update : शिवसेनेबाबात विधानसभा अध्याक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. आज जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. आज जनता जज असेल, असे संजय राऊत म्हणाले.
Uddhav Thackeray PC LIVE : उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, संजय राऊत यांच्याकडून प्रस्तावना, ठाकरेंच्या जनता न्याय पत्रकार परिषदेला तुफान गर्दी, पत्रकार परिषदेसाठी सर्वोच्च न्यायालयातील वकील रोहित शर्मा आणि अॅड. असिम सरोद यांची उपस्थिती
Uddhav Thackeray Press Conference Today: वरळी डोम येथे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. कार्यकर्त्यांनी ठाकरे स्टेजवर येताच जोरदार घोषणाबाजी केली.
Uddhav Thackeray Press Conference : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी (10 जानेवारी) पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.
Uddhav Thackeray Janta Darbar : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, वकिल रोहित शर्मा, असिम सरोदे यांच्यासह अनेक दिग्गज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत.
Uddhav Thackeray PC : काही वेळात उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषेदेला सुरवात होणार असून, वकील मंडळी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. वकिल रोहित शर्मा, असिम सरोदे स्टेजवर पोहचले आहेत. त्यामुळे, आजच्या या पत्रकार परिषेदत वकिलांची भूमिका देखील महत्वाची असणार आहे.
Uddhav Thackeray Press Conference Live : उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले आहेत. थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरु होणार आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, सचिन अहिर यांच्यासह ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते पोहचलेत.
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे 4:15 वाजता महापत्रकार परिषदेसाठी मातोश्री मधून बाहेर निघणार आहेत.
Uddhav Thackeray Press Conference Live : ‘जनता न्यायालय‘ सज्ज होतंय खरी बाजू मांडण्यासाठी! तुम्हीही सत्य ऐका आणि विचार करा! असे म्हणत ठाकरे गटाकडून आणखी एक टिझर पोस्ट करण्यात आला आहे.
Maha Patrakar Parishad Live Update : अध्यक्ष निर्णय विरोधात सुप्रिम कोर्ट अथवा हायकोर्टात जाता येईल. एकनाथ शिंदे यांना हायकोर्टाने 22 तारीख दिली आहे. गोगावले प्रकरणात नोटीस इशू केली तर उद्धव ठाकरे यांना हाय कोर्टात जावे लागेल. आधी जिथे मॅटर लागेल तिथे दोघांना यावे लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर मॅटर तातडीने मेन्शन करावे लागेल. निर्णयामुळे कोणीही अपात्र नाही. दोन्ही बाजूंनी याचिका दाखल केली आहे.प्राथमिकता ठरवावी लागेल. एकनाथ शिंदेंना वाटते की हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांना नोटीस इशू करावी, तसे झाले तर सुप्रिम कोर्ट म्हणेल की आधी हायकोर्टामध्ये प्रकरण पूर्ण करा, असे सुप्रिम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.
Rahul Narwekar Press Conference : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. याविरोधात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत कोणते आरोप करणार? काय पुरावे सादर करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत. आणखी वाचा
Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंनंतर राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहे. सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरेंना
राहुल नार्वेकर प्रत्युत्तर देणार आहेउद्धव ठाकरेंना राहुल नार्वेकर देणार प्रत्युत्तर देणार आहे. विधीमंडळात पत्रकार परिषद घेणार आहे.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. तसंच, शिवसेनेत 2018 साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडीओ दाखवले जाण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत काही कायदेतज्ञांनाही बोलावण्यात आलंय. ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जातंय. त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Maha Patrakar Parishad Subject: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांचे अधिकार, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची 2013 साली झालेली निवड याचे दाखले आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आलीये. सोबतच 2013 साली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा या शिवसेना पक्षात होते आणि या पक्षप्रमुख निवडीच्या वेळी ते सुद्धा उपस्थित असल्याचा पुरावा दाखवला जाईल. 2012 ते 2022 च्या दरम्यान ज्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठका झाल्या याचे व्हिडिओ देखील दाखवले जातील. शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेले बदल, पक्षप्रमुखांचे अधिकार या सगळ्यांची विस्तृत चर्चा या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे
Maha Patrakar Parshad : ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचा टीझर जारी करण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता महापत्रकार परिषद होणार आहे. अपात्रता निकालावर उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maha Patrakar Parishad: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः पत्रकार परिषदेत संबोधित करतील. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असतील . कायदे तज्ज्ञ असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे मुख्यत्वे करून उपस्थित असणार आहेत
Janata Court: 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद वरळी एनएसई डोम येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय असं नाव देण्यात आले आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maha Patrakar Parishad Live Update : माझं पद अवैध होतं तर अमित शाह मातोश्रीवर का आले होते? उद्धव ठाकरे