Maha Patrakar Parishad anil Parab : १९९९ ची घटना शेवटची मानून त्यावर राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला. त्या घटनेत सर्वोच्च अधिकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते, त्यानंतर ते कुणालाही दिल्याची आमच्याकडे नोंद नाही असं निवडणूक आयोगानं सांगितले. त्याचाच आधार राहुल नार्वेकरांनी घेतला. मात्र त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी मी काही पुरावे सादर करणार असल्याचे म्हणत अनिल परब यांनी २०१३ साली राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेले ठराव वाचून दाखवत राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र सोडले. जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, असा पुरावादेखील त्यांनी सादर केला.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना अपात्रता प्रकरणात दिलेल्या निर्णयानंतर मंगळवारी (दि. 16) शिवसेना ठाकरे गटाने महा पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी अनिल परब म्हणाले की, 1999 च्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवर शिवसेनेची कोणतीही घटना नाही. त्यामुळे 1999 ची घटना तुमची शेवटची घटना आहे. त्या घटनेत सर्वोच्च अधिकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होते. त्यानंतर अधिकार कुणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही. आता बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे, असे समजून पक्ष आणि चिन्ह काढून घेतली. 


निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागतल्या, त्याची पूर्तता केली


निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावर्ती आपल्या निकालात केली आहे. निवडणूक आयोगात केस सुरु होती, त्यावेळी निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागतल्या, त्याची पूर्तता आम्ही केली. त्यांचा खोटेपणा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा. कारण, सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यामुळे लोकांना काय झालं ते लोकांना समजून सांगावे लागेल. असे म्हणत अनिल परब यांनी सर्व पुरावे दाखवले. 


ठराव वाचून दाखवत नार्वेकरांवर टीकास्त्र


२०१३ ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्यात पक्ष घटनादुरुस्तीचे ठराव मांडले होते. त्यात पहिला ठराव शिवसेनाप्रमुख हे पद पक्षातील कुठल्याच पदाधिकाऱ्याला लावता येणार नाही. ती संज्ञा गोठवण्यात येत आहे.  दुसरा ठराव होता की शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात येत आहे. त्या पदी उद्धव ठाकरे असतील. ही निवड ५ वर्षांसाठी असेल. तिसरा ठराव कार्यकारी अध्यक्ष पद रद्द करण्यात येत आहे असा होता. 


बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारे शिवसेनाप्रमुख म्हणून असणारे सर्वाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे देण्यात येत आहेत. पक्षाबाबतचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतील, चौथा ठराव असा होता. पाचवा ठराव असा होता की, ३१ उपनेत्यांपैकी २१ जागा निवडणूक प्रक्रियेतून तर उरलेल्या १० जागा शिवसेना पक्षप्रमुख नियुक्त करतील, असे ठरावाचे पुरावे त्यांनी वाचून दाखल. तसेच  2013 साली झालेल्या बैठकीची त्यांनी व्हिडिओ क्लिप देखील दाखवली. 


ठाकरे गटाकडून चिरफाड


जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी असल्याचा पुरावा दाखवत अनिल परब यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.