आज सकाळी सेना भवनात होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांची उपस्थिती असेल. तसेच संध्याकाळी 4 वाजता स्वत: उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
दुष्काळ दौऱ्यांमध्ये सेनेच्या मंत्र्यांना मातोश्रीवरुन राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत, की नाही, याबाबत शहानिशा करण्याबाबत बजावले आहे.
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची युती होईल की नाही, हे सध्या तरी राम भरोसे आहे. परंतु आज संध्याकाळी 4 वाजता स्वत: उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबधित बातम्या
केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार
जनतेच्या कामासाठी मंदिराची मदत घ्यावी लागली : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांचं चंद्रकांत पाटलांना पाठिंब्याबाबत आश्वासन | मुंबई | एबीपी माझा