मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यात भाजप मंत्र्यांना यश आलं आहे. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. 'दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेलं असतं, मात्र शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच' असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे.

सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे मातोश्रीवर गेले होते. आपला योग्य तो सन्मान राखला गेला, तर सोहळ्याला उपस्थिती लावू, असे संकेत ठाकरेंनी दिल्यानंतर भाजप मंत्री निमंत्रण देण्यासाठी उद्धव यांच्या घरी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपूजन कार्यक्रमात असतीलच, शिवाय त्यांचा सर्व प्रकारचा सन्मान राखला जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. 'दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेलं असतं, मात्र शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच' अशी पुस्तीही पाटलांनी जोडली.

https://twitter.com/TawdeVinod/status/811468906002976768

आम्ही गेलो नाही तरी उद्धव ठाकरे अरबी समुद्रातील जलपुजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारचं भूमीपूजन होणार आहे.

संबंधित बातम्या :


उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री 'मातोश्री'वर जाणार!


उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री 'मातोश्री'वर जाणार!


शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा


शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार


अरबी समुद्रातील शिवस्मारकाला मच्छिमारांचा तीव्र विरोध


शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी, सर्व राजघराण्यांना निमंत्रण