पंकजा मुंडेंनी अधिकारांचा वापर करुन अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियम धाब्यावर बसवले. एकाच दिवशी अनेक जीआर काढून 206 कोटींच्या वस्तूंसाठी 24 कंत्राटं दिली, असा आरोप पंकजा मुंडेंवर होता. मात्र, एका दिवसात किती कंत्राटं द्यायची याचा पूर्ण अधिकार संबंधित मंत्री आणि खात्याचा असल्याचं स्पष्टीकरण एसीबीने दिलं आहे.
चिक्की घोटाळ्याप्रकरणी झालेले आरोप आणि त्यावरचं एसीबीचं स्पष्टीकरण
आक्षेप क्रमांक 1
अंगणवाडीसाठी एका दिवसात 24 कंत्राटं का दिली?
एसीबीचं स्पष्टीकरण
असा नियम नाही, तो मंत्र्याचा किंवा विभागाचा अधिकार
आक्षेप क्रमांक 2
रेट कंत्राट काढताना ई-टेंडरिंगचा वापर का नाही?
एसीबीचं स्पष्टीकरण
कंत्राटदारांची निवड यादीतूनच, ई-टेडरिंगची गरज नाही
आक्षेप क्रमांक 3
गजरेपेक्षा जास्त वस्तू का मागवल्या?
एसीबीचं स्पष्टीकरण
महाराष्ट्रात लाखो अंगणवाड्यांना वस्तूंची गरज
आक्षेप क्रमांक 4
खाद्यपदार्थांची गुणवत्ता खराब का?
एसीबीचं स्पष्टीकरण
दोषींवर विभागाकडून तातडीने कारवाई