जेव्हा उदयनराजे गाणं गातात...
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2019 04:54 PM (IST)
साताऱ्यामध्ये आज उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
सातारा : साताऱ्यामध्ये आज उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं गायलं. या कार्यक्रमात अध्यक्षांचं भाषण सुरू होतं. मात्र उदयनराजेंनी लोकांची करमणूक म्हणून यावेळी एक गाणं गाऊन दाखवलं. खासदार उदयनराजेंनी आपल्या भाषणात पुरस्कार मिळालेल्यांचं यावेळी कौतुक केलं. मात्र त्यानंतर राजेंनी 'तुम्हाला गाणं ऐकायचंय का?' असा प्रश्न उपस्थितांना केला. बराच वेळपासून सगळ्यांची भाषणं सुरु आहेत असं म्हणत राजेंनी थेट गाणं गायला सुरवात केली. व्हिडीओ :