उदयनराजेंचं व्हॅलेंटाईन्स गिफ्ट, 'फ्लाईंग किसेस टू एव्हरी वन'
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 12:35 PM (IST)
मुंबई: नेहमी रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. 'व्हॅलेंटाईन्स डे'बाबत विचारलं असता, 'फ्लाईंग किसेस टू एव्हरी वन' असं भन्नाट उत्तर उदयनराजेंनी दिलं. व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट काय, असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला, त्यावर उदयनराजेंनी प्रश्न विचारणाऱ्यालाच प्रतिप्रश्न केला, तुझं लग्न झालंय का? तू काय दिलं व्हॅलेंटाईन्स गिफ्ट? यानंतर उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, "अहो व्हॅलेंटाईन्स म्हणजे, फ्लाईंग किसेस टू एव्हरी वन" त्यानंतर थोडं थांबून उदयनराजे म्हणाले, फ्लाईंग किसेस टू एव्हरी वन, फक्त पुरुषांना नाही. नाहीतर लोकं म्हणतील माझी प्रायोरिटी बदलली की काय.. (उदयनराजेंचा हा व्हिडीओ प्रशांत जगताप या यूट्यूब अकाऊंटवर 10 फेब्रुवारी 2017 रोजी अपलोड झाला आहे. मात्र हा दोन वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. ) VIDEO: