सातारा : सातारा नगरपालिकेने घेतलेल्या डंपरचे नुकतेच उद्घाटन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. उदयनराजेंनी या डंपरचे नुसते उद्घाटनच केले नाही तर स्टेअरिंग हाती घेत चौपाटीला फेरफटकाही हाणला.

‘मी राजकारणात आलो नसतो तर मी एक उत्कृष्ट रेसर झालो असतो’ असे उदयनराजे नेहमीच सांगत असतात. या गाडी चालवण्याच्या स्टाईल मधून त्यांना डंपर चालवणे चांगलेच जमल्याचे दिसत आहे.

डंपरबरोबर राजकारणातली अनेक स्टेअरिंग ते सहजतेने फिरवातात हे राज्यातल्या प्रत्येक नेत्याला माहित आहेच. मात्र सध्या राष्ट्रवादीच्या गाडीचं स्टेअरींग सोडून देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे.