सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नोटाबंदीवरुन पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आहे. नेहमीच्या शैलीत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी नोटाबंदीवर सडकून टीका केली आहे.



कराड येथील प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी मोदींच्या नोटाबंदीचा समाचार घेतला आहे. "कोण मोदी... आमच्याकडे मोदी कंदी पेढेवाले आहेत," अशा शब्दात त्यांनी मोदींची खिल्ली उडवली. याशिवाय मोदींना घाबरुन भाजप खासदार नोटाबंदीला विरोध करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दररोजच्या नोटाबंदी संदर्भातील वेगवेगळ्या नियमांमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड  उद्रेक असल्याचंही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. याच कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नोटाबंदीच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला.

व्हि़डीओ :