उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्त विद्यापीठ आहेत : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 24 Feb 2018 08:22 PM (IST)
‘पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून राजे खासदार म्हणून निवडून आले असले तरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ते एक मुक्त विद्यापीठ आहेत.’
सातारा : ‘पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून राजे खासदार म्हणून निवडून आले असले तरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ते एक मुक्त विद्यापीठ आहेत.’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवस सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ : मुख्यमंत्री दरम्यान, उदयनराजे भोसलेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत विशेष सोहळ्याचं आयोजन केलं. याचवेळी अनेक विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. मोदी लाटेतही उदयनराजे मोठ्या मताधिक्क्यानं निवडून आले. मात्र, तरीही साताऱ्यात राष्ट्रवादीचा एक गट उदयनराजेंच्या विरोधात आहे. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाच्या निमित्तानं उदयनराजे आपल्या पक्षाला काही मेसेज देऊ इच्छितात का?, अशीही चर्चा आता साताऱ्यात रंगू लागली आहे. VIDEO : संबंधित बातम्या : खा. उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन