Uday Samant Attack LIVE Updates : हल्ला कुणी केला? पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे गट आक्रमक

Uday Samant Attack LIVE Updates : पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. तसेच, अंत पाहू नका, असं ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Aug 2022 03:52 PM
अशाप्रकारच्या हल्ल्यांना लोकशाहीत थारा नाही, उदय सामंतांवरील हल्ल्या प्रकरणी दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar on Uday Samant : आमदार उदय सामंत यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. अशा प्रकारचा हल्ला करणं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी अशोभनीय आहे. लोकशाहीत याला थारा नाही. एखाद्याचा विरोध करायचा असेल तर तो लोकशाही पद्धतीने करावा. शिवसेनेचे जे नेते विविध ठिकाणी जाऊन आमच्याबद्दल बोलत आहेत, ते त्यांनी विचार करुन बोलावं, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

'असे हल्ले करणारे हे भ्याडच!' उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर रत्नागिरी शहरात समर्थकांकडून बॅनर

Uday Samant Attack : पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवरती हल्ला झाला. त्यानंतर त्याचे पडसाद आता रत्नागिरी शहरात देखील दिसून येत आहेत. उदय सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी शहरात सामंत समर्थकांनी बॅनर लावले आहेत. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे बॅनर लावले आहेत. शहरातील प्रमुख चार ते पाच ठिकाणी मध्यरात्री बॅनर लावत सामंत समर्थकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे साळवी स्टॉप या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या शाखेत समोरच जाहीर निषेध, विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते. 'असे हल्ले करणारे हे भ्याडच!' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. उदय सामंत यांनी मध्यरात्री ट्वीट करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. त्यानंतर आता सामंत समर्थकांनी हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे निश्चितच आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटताना दिसून येणार आहे.

Uday Samant Attack : उदय सामंत यांच्या कारवर हल्ला; पुण्यात रात्रभर पोलिसांकडून धरपकड, 5 अटकेत

Uday Samant Attack : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Neelam Gorhe on Uday Samant Attack : विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये : डॉ.नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe on Uday Samant Attack : पुण्यात काल (मंगळवार) शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे दिसून येत आहे. हल्ला करणारे नेमके कोण आहेत, हे जोपर्यंत स्पष्ट होत नही, तोपर्यंत ते शिवसैनिकच आहेत, असे गृहित धरणे चुकीचे असल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 


Uday Samant Attack : शांत आहे म्हणजे हतबल, असाह्य नाही; हल्ल्यानंतर उदय सामंत यांचं ट्वीट

Uday Samant Attack : महाविकास आघाडीतील माजी मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मध्यरात्री एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र"


 





Uday Samant Attack LIVE : शिवसेना-'शिंदे'सेनेत संघर्षाची ठिणगी! शांत आहे म्हणजे हतबल, असाह्य नाही; हल्ल्यानंतर उदय सामंत यांचं ट्वीट

Uday Samant Attack LIVE : पुण्यातल्या (Pune) कात्रजमध्ये शिंदे गटातील (CM Eknath Shinde) आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांकडून सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सामंत यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाली असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेनं जात होते. त्यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


 



Uday Samant Attack : बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

Uday Samant Attack : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षात काल पुण्यातल्या कात्रजमध्ये रस्त्यावरच्या राड्याची ठिणगी पडली. शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. पुण्याच्या कात्रज परिसरात ही घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. त्यासाठी उदय सामंतही दगडूशेठच्या मंदिराच्या दिशेनं जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंतांना इजा झालेली नाही, पण त्यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Uday Samant Attack : पुण्यातल्या कात्रजमध्ये शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांकडून सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सामंत यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाली असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेनं जात होते. त्यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


महाविकास आघाडीतील माजी मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मध्यरात्री एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र"


गाडीवर दगड मारुन पळून जाणं ही मर्दुमगी नाही. कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं काम सरकारचं आणि पोलिसांचं आहे. त्यामुळे ज्यांनी हे केलंय त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम पोलीस करतील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


शिवसेना नक्की कोणाची?


शिवसेना नक्की कोणाची? ठाकरेंची  की शिंदेंची? असा वाद सुरु आहे. मात्र हे सगळं निवडणूक आयोगाला ठरवू द्या, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. यावर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर  3 तारखेला म्हणजेच, आज सर्वोच्च न्यायालयात प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रश्नावर सुनावणी न घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सुनावणीच्या एक दिवसा आधी दोघेही आमने-सामने आले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.