तारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 04:12 PM (IST)
सिंधुदुर्ग : सांगलीतील दोघं जण तारकर्ली समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. निखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्निल मोहिते या तरुणाचा शोध सुरु आहे. निखिल व्यवसायाने शिक्षक असून स्वप्निल इंजिनिअर असल्याची माहिती आहे. एकूण आठ जण फिरायला आले होते. त्यापैकी दोघं जण बुडाले. सर्व जण सांगलीतील तासगावजवळच्या मांजर्डीमधले रहिवासी आहेत.