उस्मानाबादमधील रघुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 01:07 PM (IST)
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या नगरपरिषदेअंतर्गत राघुचीवाडीने थेट मतदानावर बहिष्कार घातला आहे. वाढीव हद्दीत सुविधा मिळत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षा रक्षक वगळता एकही व्यक्ती दिसत नाही. उस्मानाबाद नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यानंतर राघुचीवाडी गावही नगरपरिषदेअंतर्गत आलं. मात्र सुविधा काहीच मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी अनेकवेळा केली. पण प्रशासनाने त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. राज्यात आज 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.