उमेदवार किंवा मतदार नसताना तुम्ही मतदान केंद्रावर का आलात, असा सवाल महिला पोलिसाने केला. यावर संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्या गाडीला मंत्रालयात कोणी अडवत नाही, तुम्ही अडवणारे कोण, अशा शब्दात उत्तर दिलं.
या वादावादीत चरेगावकर यांनी शिवीगाळही केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला आहे. घडलेल्या प्रकारावेळी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकरही उपस्थित होते. मात्र त्यांनी काहीही ठोस भूमिका न घेता महिला पोलिसाला शांत बसण्यास सांगितलं.
दरम्यान चरेगावकर यांनी महिला पोलिसानेच आपल्याला शिवीगाळ केली, असा प्रतिदावा 'माझा'शी बोलताना केला आहे. आपण महिला पोलिसाला कसलाही अपशब्द वापरला नसल्याचं स्पष्टीकरण चरेगावकर यांनी दिलं.
पाहा व्हिडिओ :