Dhule: धुळे तालुक्यातील (Dhule Taluka) नंदाणे गावालगत (Nandane Village) असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी- भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. आज (14 फेब्रुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. 


सुंदरबाई समाधान होलार (वय 21 रा. नंदाणे ) भाची शिवानी आंबा होलार (वय 7 रा. नागद ता.चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत. सुंदरबाई ही भाचीला सोबत घेऊन गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. सुंदरबाई कपडे धुत असतांना जवळ उभी शिवानी पाय घसरून पाण्यात पडली. तिच्याकडे लक्ष गेल्यावर मामी सुंदरबाईनं शिवानीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 


ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा जवळच्या शेतात गुरांना चारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला तलावात दोन जणं पाण्यात पडल्याचं दिसलं. त्यानं आरडाओरडा केला. त्यानंतर वस्तीजवळ असल्यानं नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं नातेवाईकांनी मामी- भाचीला पाण्यातून बाहेर काढलं. त्यांना तत्काळ सोनगीर येथील ग्रमीण रुग्णालयत दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषीत केलंय. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha