पिंपरी/ सोलापूर : पिंपरीत आज एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याने, मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नळदुर्ग-उमरगा रोडवरल कंटेनरनं अचानक पेट घेतल्यानं, रोडवरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली होती. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील कुदळवाडीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं, तरी मोठं नुकसान झालं आहे. या आगीने परिसरातील 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत. तब्बल अडीच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. पण यामुळे येथील नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे सोलापुरातील नळदुर्ग-उमरगा रस्त्यावर चालत्या कंटेनरनं अचानक पेट घेतला. कंटेनरमध्ये मुंबईहून हैदराबादला रासायनिक पदार्थ घेऊन जात होता. पण रासायनिक पदार्थांनी अचानक पेट घेतल्यानं भररस्त्यात कंटनेर जळून खाक झाला. या घटनेनंतर काहीकाळासाठी नळदुर्ग-उमरगा रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. संबंधित बातम्या भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका