मुंबई-गोवा हायवेवर लांज्याजवळ बस दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 01:57 AM (IST)
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसच्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी आहेत. लांज्याजवळीच अजनारी घाटात आज पहाटे हा अपघात झाला. विशाल ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून देवगडकडे जात होती. मात्र अजनारी घाटात चालकाचं ताबा सुटल्याने बस थेट 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी लांज्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांच्या 2 ते 3 किमीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. तसंच गणेशोत्सव एका दिवसावर आल्या मुंबईकर चाकरमान्यांनी कोकणची वाट धरली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारच्या सुट्ट्या जोडून आल्यानेही या मार्गावर शनिवारी संध्याकाळपासून वाहतूक कोडी आहे.