नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्याने आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्या बैठकीत दोन मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली.
प्रकल्पग्रस्तांच्या गावातील अत्यावश्यक सोयी त्वरित सुरु करण्यात येतील आणि गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासंदर्भातली मागणी मान्य करण्यात आली आहे. तसंच प्रकल्पग्रस्त आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त समिती संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेल आणि 15 दिवसात अहवला सादर झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.
मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
मान्य झालेल्या दोन मागण्या
1) गावातल्या बंद पडलेल्या अत्यावश्यक सोयी लगेच सुरु केल्या जातील
2) गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी जी सध्या 243.85 मीटर एवढी वाढवली आहे, ती कमी करण्याचे प्रयत्न केले जातील.
आमदार निवासाचा ताबा
प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी काल (20 ऑक्टोबर) दुपारपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपूरच्या आमदार निवासाचा ताबा घेतला.संतप्त आंदोलनकांनी काल गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही केली. सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती. नागपूरच्या आमदार निवासात काल बैठक बोलावली असता, त्यात मोर्चा काढण्याचं ठरलं. मात्र जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त दोघेही नसल्यामुळे नंतर आमदार निवासच आंदोलनाचं ठिकाण बनलं.
सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण
यानंतर आज सरकारकडून आमदार निवासावर ताबा घेतलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावणं आलं आहे. या चर्चेसाठी आमदार बच्चू कडू रवाना झाले आहेत. नागपूर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत वाद
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ग्रामस्थांना बैठकीतून बाहेर काढलं.नागपुरात आज बावनकुळे यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावातल्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळेंसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की बावनकुळेंनी काही ग्रामस्थांना बैठकीच्या बाहेर काढलं.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण, आंदोलन मागे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2018 03:48 PM (IST)
मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -