रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वात मोठी केमिकल कंपनी म्हणून खेड तालुक्यातील घरडा केमिकल कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीत विविध प्रकारची केमिकल तयार होतात. आज सकाळी कंपनीमध्ये प्लांट 7 बी मध्ये दोन स्फोट झाले. या स्फोटाच्या आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की बचाव कार्याला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 


आज सकाळी नेहमीप्रमाणे या प्लांटमध्ये 40 ते 50 कामगार गेले असता कामगाराच्या टी टाइम नंतर स्फोट झाला. त्यामुळे काही कामगार अडकले होते. आतमध्ये झालेल्या स्फोटामुळे आतील कामगारांना आगीच्या ज्वाळा बसल्या त्यामध्ये कंपनीच्या बचाव पथकाने पाच जणांना बाहेर काढले. त्यांना अधिक उपचारासाठी खेड मधील उपजिल्हा रुग्णालयमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान चौघाचा मृत्यू तर एकाची परिस्थिती गंभीर आहे. काही कामगार आतमध्ये अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. लागोपाठ झालेल्या दोन स्फोटामुळे खेड एमआयडीसी हादरली असून स्थानिक रहिवासी भयभीत झालेत.




गेल्या वर्षभरात एमआयडीसीमधील विविध कंपनीमधील हा पाचवा स्फोट आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधी आज चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. स्फोटाची गंभीर परिस्थिती पाहता माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्फोट होऊन काही तास उलटून गेले तरी संबंधीत प्रशासकीय अधिकारी आले नाही.




प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी पैसे घेऊन या कंपनीची पाठ राखण करतात. यातल्या प्रदूषित कंपन्यामुळे स्थानिक लोकांना कँसर सारखे आजार झाले आहेत. त्यापैकी 81 ग्रामस्थांना प्रदूषणाची बाधा झाली आहे. आजच्या स्फोटामुळे कंपनीवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे.




मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 55 लाख रुपये जे उपचारासाठी मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले त्यासाठी 20 लाख रुपये मदत पूर्ण उपचार खर्च देणार असे कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा करून मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. एमआयडीसी कंपनीत स्टक्चर ऑडिट झाले पाहिजे. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय चिपळूणचे लोटेमध्ये येणार आहे.