मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले.
जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. म्हात्रेंवर हल्ला केल्यानंतर दोन्हीही हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, अखेर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वीही मनोज म्हात्रेंवर भिवंडीमधील नारपोली भागात हल्ला करण्यात आला होता.
दरम्यान म्हात्रेंची हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे, तर कौटुंबिक कारणातूनच झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा अंदाज लावला जात होता.