मुंबई : तारखेनुसार साजरी केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमीत्त राज्यासह देश आणि विदेशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पुजा सकाळी दहा वाजता होणार आहे. तर राज्यभरात विविध संघटनांकडून मिरवणुका, रॅलींचं आयोजन करण्यात आलंय.
पंतप्रधान मोदींकडून मराठीत शिवजयंतीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्वीट करुन शिवरायांना नमन केलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.’ अशा पहिल्या ट्वीटसह मोदींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
https://twitter.com/narendramodi/status/833129645469999104
‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.’ या शब्दात दुसऱ्या ट्वीटमधून मोदींनी शिवरायांचा गौरव केला आहे.
https://twitter.com/narendramodi/status/833129769696890882
‘शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.’ असं वचन देतानाच ‘नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील.’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
https://twitter.com/narendramodi/status/833129994016661504
https://twitter.com/narendramodi/status/833130184379420673