सोलापूर/अकलूजः संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण आज सराटी येथे पार पडलं. अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला वारकऱ्यांसोबत भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.


 

पताकाधारी वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन असलेल्या महिला भाविकांनी तुकोबारायांच्या पालखीची प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर मानाच्या अश्वांनी धुराळा उडवत गोल रिंगण पूर्ण केलं. तुकोबारायांच्या पालखीनं आता पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

 

तुकोबांची पालखी आज अकलूजच्या विठ्ठल मंदीरात मुक्कामी असणार आहे. तुकोबांच्या पालखीचं हे तिसरं गोल रिंगण होतं. तर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज सोलापुरच्या सदाशिवनगरमध्ये पार पडणार आहे.