Sharad Pawar : जंगल वाचवण्याचं काम आदिवासी समाज (Tribal society) करतो. जंगल वाचलं तर पाऊस येईल, पाऊस आला तरच जमीन टिकेल. आदिवासी समाजमुळंच पर्यावरण टिकून राहिलं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळी होण्याची वेळ येते आणि अत्याचार होतात असेही पवार म्हणाले. आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केलीत. यातून तुम्ही लाचार नसून स्वाभिमानी असल्याचं स्पष्ट केलं असल्याचे पवार म्हणाले.


पवारांच्या हातात धनुष्यबाण देऊन सन्मान 


आज शरद पवार यांच्या उपस्थितीत जुन्नरमधील लेण्याद्री गडाच्या पायथ्याशी आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमात आदिवासी समाजाकडून शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पवारांच्या हातात धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पवारांनी सुद्धा धनुष्यबाण उंचावून सन्मानाला दाद दिली. जुन्नरमधील लेण्याद्री गडाच्या पायथ्याशी होत असलेल्या आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याला शरद पवार यांच्यासह विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम उपस्थित होते.


आदिवासी त्यांच्या गरजांसाठी लढतायेत


जल, जंगल आणि जमीन हा जगातील महत्वाचा दुवा आहे. यातील जंगल वाचवण्याचे काम आदिवासी समाजानं केलं आहे. आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळी होण्याची वेळ येते आणि अत्याचार होतात. अशा परिस्थितीत त्यांना आवाज उठवावा लागतो, त्यातून संघर्ष निर्माण होतो. हा तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर तो तुम्हाला खुशाल वाटू द्या. ते त्यांच्या गरजांसाठी लढत असतात असेही पवार म्हणाले. 15 ऑक्टोबर ला नागपुरात होणाऱ्या आदिवासी समाजाच्या आंदोलनात असेच मोठ्या संख्येने सहभागी व्हा. जगात एकोप्याचा संदेश द्या, असे आवाहनही शरद पवार यांनी केलं


शिवजन्मभूमीत गांधी जयंती दिवशी मेळावा, पवारांनी आयोजकांचे मानले आभार


आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिला आहात. तुमचं दुखणं इथं मांडलं. महात्मा गांधींची आज जयंती आहे. इंग्रजांचे दीडशे वर्षाचं राज्य घालवण्याचं  ऐतिहासिक काम त्यांनी केल्याचे शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्याचा महामंत्र अख्ख्या जगाला महात्मा गांधींनी दिला. त्यांना अभिवादन करत असल्याचे पवार म्हणाले. शिवजन्मभूमीत गांधी जयंती दिवशी हा मेळावा घेतला त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो असेही पवार म्हणाले. काही लोक म्हणतात तुम्ही यांच्याशी जास्त संबंध ठेवता. तुम्हाला माहित आहे, हे नक्षलवादी आहेत. मी म्हणतो मला माहित आहे. पण हे कसले नक्षलवादी आहेत तर आम्ही कोणाला धक्का लावणार नाही, पण आम्हाला धक्का लावला तर आम्ही त्यास सडेतोड उत्तर देतो. असा हा नक्षलवाद असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


दांभिक धार्मिक व्यवस्थेला आव्हान देऊन लोकांची मानसिक गुलामीतून मुक्त करण्याची महात्मा फुलेंची भूमिका: शरद पवार