मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ परशुराम घाटात रस्त्यावर वडाचं मोठं झाड कोसळल्यामुले विस्कळीत झालेली वाहतूक, हळूहळू सुरळीत होत आहे. तब्बल अडीच तासानंतर एका बाजूची वाहतूक सुरु झाली आहे.


झाड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

झाड कोसळल्यामुळे सुमारे तीन-तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीनं हे झाड बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

एकीकडे पावसामुळे आधीच वाहनं संथ गतीने धावत आहेत, त्यातच झाड कोसळल्यामुळे वाहतूक रखडली आहे.