पाचोरा-जामनेर दरम्यान नदी पुलावर रेल्वेचे 3 डबे घसरले
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 11 Jun 2016 05:19 PM (IST)
जळगाव: जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले. बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे. पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.