Traffic Updates : सलग सुट्ट्यांमुळे राष्ट्रीय महामार्गासह मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam on Mumbai Expressway) दिसून आली.  शनिवार, रविवारनंतर सोमवारीदेखील सुट्टी जोडून (Holidays) आल्याने अनेकांनी पर्यटनस्थळी, गावाकडे जाण्यास पसंती दिली आहे. आज सकाळपासून मुंबई बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सकाळी वाशी टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसून आली होती. 


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी


सकाळी खंडाळा घाटात खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या. सध्या राज्यात बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे लोकांनी आता बाहेर पडण्यास पसंती दिली आहे. त्याचप्रमाणे शाळा, कॉलेजला देखील सुट्टी असल्यामुळे बरीच लोकं फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडली आहेत. काही वेळेसाठी मुंबईला जाणारी वाहने थांबवण्यात येत असल्याने या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. लोणावळ्याजवळ वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. 


खंडाळा घाटातील कामामुळे जास्त वाहतूक कोंडी


खंडाळा घाटात सध्या महामार्ग दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे या भागात वाहने धीम्यागतीने सरकत आहेत. त्याच्या परिणामी वाहतूक कोंडी होत असल्याचे म्हटले जात आहे. 


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी 


सलग सुट्ट्यांमुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग़ावर  वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पालघर, वसई-विरार, मुंबई ठाणे येथून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत, याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. 


वसईहून ठाणे मुंबईकडे जाणारी वाहतूक, मुंबईहून गुजरात, ठाणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहानांची रांग लागल्याचे चित्र सकाळी दिसून आले.


शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर कामगार दिनाची सुट्टी त्यात मुलांना सुरु असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


 









महत्त्वाच्या इतर बातम्या 


Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज...