पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune Mumbai Expressway) मोठी वाहतूक कोंडी झालीय. बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. परंतु, यामुळे महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नोकरदारांना यंदा शनिवार आणि रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील नोकरदारवर्ग गोवा, लोणाळ्यासह इतर पर्यटनस्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. खासगी वाहनाने मुंबईकर बाहेर पडले आहेत. परंतु, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुले मुंबई ते पुणे या तीन तासांच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास वेळ लागत आहेत.  

लोणावळ्यात यंदा नव वर्षाचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यासाठी तेथे जंगी तयारी करण्यात येत आहे. लोणावळ्यात हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत.या पर्यटकांच्या स्वागतासाठी रोषणाई करण्यात आलीय. दोन वर्षांची कसर भरून काढण्यासाठी व्यावसायिकांनी कंबर कसली आहे. मुंबईतील नोकरदारवर्ग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी याच ठिकाणला जास्त पसंती देतो. त्यामुळे आज, उद्या आणि परवा मुंबईकर लोणावळ्याला जात असतात. परंतु, मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर पडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होते. 


पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी इव्हेंट आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉटेल्सकडून वेगवेगळे ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. हॉटेल्सकडून काही खास मेन्यू देखील तयार करण्यात आले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करताना सगळ्यांना मस्ती, धमाल, आनंद घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाऊले आपसूकच पुण्याकडे वळत आहेत. 


मागच्या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी देखील बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ख्रिसमस आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे  पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली होती. तीच परिस्थिती आज देखील निर्माण झाली आहे. पर्यटनाचा आनंद घेण्याआधी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 


महत्वाच्या बातम्या


साईबाबाच्या दर्शना आधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भांडूप येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू  


Pune : तळीरामांनो सावधान! नव्या वर्षात घरी नाही तर पोलीस कोठडीत जाल; 'यूज अँड थ्रो' पाईपने होणार तपासणी