Pune new year 2023 : मद्य प्राशन करुन (pune) वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची असणार करडी नजर असणार आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर असणार नाकाबंदी (New year) करण्यात येणार आहे. यात महत्वाचं म्हणजे ब्रेथ अॅनालायझरने प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून यूज अँड थ्रो पाईपचा होणार वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक वेळी होणार नव्या पाईपचा वापर
पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवं वर्ष जल्लोषात साजरं होणार आहे. त्यामुळे शहरातच नाहीतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. याच जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात महत्वाचं म्हणजे दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची असणार करडी नजर असणार आहे. 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' करणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर मार्फत तपासणी होणार आहे. जगात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यात पुण्यात सिंगापूरहून आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात खबरदारी घेण्यात येत आहे. ब्रेथ अॅनालायझरचा वापर करत असताना प्रत्येक वेळी होणार नव्या पाईपचा वापर करण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाई होणार
या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं जातं. त्यानंतर गाडीवरुन प्रवास करतात. त्यांच्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे "ड्रिंक अँड ड्राईव्ह" करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना 1000 रुपये दंड तसेच वाहन देखील जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.
दीड लाखाहून अधिक 'वन डे परमीट'ची विक्री
पुण्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दीड लाखाहून अधिक 'वन डे परमीट'ची विक्री झाली आहे. मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी परवाने दिले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचा 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जोरात होणार आहे.
रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु
31 डिसेंबरला पुण्यातील रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांचं नवं वर्ष धुमधड्याक्यात साजरा होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.