रायगडः पर्यटनासाठी रायगड किल्ल्यावर गेलेल्या पर्यकाचा अंगावर दगड पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड येथे घडली आहे. रायगड किल्ल्यावरुन खाली उतरताना मणक्यावर दगड पडला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच पर्यटकाचा मृत्यू झाला.

 

अजय प्रताप सिंह असं 29 वर्षीय पर्यटकाचं नाव असून ते पुण्याचे आहेत. काल दुपारी ही घटना घडली. पुण्याहून 17 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडावर गेला होता. मात्र खाली उतरताना अजय सिंह यांच्यावर काळाने घाला घातला.

 

अजय सिंह यांना दुर्घटनेनंतर तत्काळ महाडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.