जालनाः भोकरदन तालुक्यातील आलापूर गावात नदी ओलांडताना 30 वर्षीय तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दीपक मिरकर असं वाहून गेलेल्या तरूणाचं नाव आहे. गावातल्या नदीला पूर आला असतानाही दीपकनं मोटरसायकलवरून नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचं हे धाडस त्याच्या जीवावर बेतलं.

 

गावकऱ्यांना दीपकची मोटरसायकल मिळाली असून, ते दीपकचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जालन्यात पावसाने जोर धरला आहे, मात्र पाण्यात घुसण्याचं धाडस कसं जीवावर बेतू शकतं, ते या निमीत्ताने समोर आलं आहे.

 

त्यामुळे पावसाळ्यात पूल किंवा नदी ओलांडताना कसलीही जोखीम स्वीकारु नये, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.