दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*1.* ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3Vsuef7 'अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले'; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली https://bit.ly/3idQrPZ
*2.* पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मुलांना मनस्ताप, वेबसाईट वारंवार होतेय हँग, रात्र काढावी लागतेय जागून, फॉर्म भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी https://bit.ly/3VwgU9t
*3.* इस्रोची नवी 'गगन भरारी', PSLV C54 रॉकेट लाँच, ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण https://bit.ly/3XDpqFU
*4.* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदार-खासदारांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, बळी प्रथेवर बोट ठेवत विरोधकांचं टीकास्त्र https://bit.ly/3tZZNBh मुख्यमंत्री म्हणाले, कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं तयार झालंय https://bit.ly/3GMOGmQ कामाख्या देवीच्या दर्शनासाठी शिंदे गट गुवाहाटीला; पण 'हे' मंत्री, आमदार-खासदार मात्र राज्यातच https://bit.ly/3Vq2xDK
*5.* भाजपच्या तिकिटावर लढणार नाही हे गद्दारांनी जाहिरपणे सांगावं, उद्धव ठाकरेंचा बुलढाण्यात हल्लाबोल, भाजप हा आयात, भाकड पक्ष असल्याचीही टीका https://bit.ly/3U8wF5A मुख्यमंत्री 40 येड्यांचा बळी द्यायला गुवाहाटीला गेले, संजय राऊतांचं टीकास्त्र https://bit.ly/3Vb6lcf
*6.* राज्यपाल कोश्यारींकडून हुतात्म्यांचाही अनादर, काँग्रेसचा आरोप; राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्टीकरण तर भाजपकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट करत उत्तर https://bit.ly/3u6CBRO
*7.* सोलापुरात वकील गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकार परिषद सुरु असताना संभाजी ब्रिगेडचा गोंधळ https://bit.ly/3GR5sBl
*8.* कोल्हापुरातून कर्नाटकच्या दिशेनं बस रवाना, तर कर्नाटकातूनही वाहतूक सुरु, मात्र सोलापुरात बोम्मईंच्या निषेधार्थ बस रोखली https://bit.ly/3XKGXvQ
*9.* सेल्फी जीवावर बेतली! विकेंड साजरा करण्यासाठी गेलेल्या चार महाविद्यालयीन तरुणींचा कोल्हापुरातील किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू https://bit.ly/3GP8TIY
*10.* श्रद्धा वालकरच्या हाडांची आणि वडिलांच्या रक्ताची डीएनए चाचणी, जंगलातील मृतदेहाचा अवशेष श्रद्धाचाच असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3U9Ul9R
*ABP माझा स्पेशल*
संविधान दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, बारामतीत रॅली तर अकोल्यात 'वॉक फॉर संविधान'चे आयोजन https://bit.ly/3UafeSe
आधी राज्यातील उद्योग गेले, आता जागतिक वारसास्थळांचा दर्जाही जाण्याचा धोका https://bit.ly/3UbpKIR
काय सांगता! अरिजीतच्या पुण्यातील कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत तब्बल 16 लाख रुपये; चाहते म्हणतात त्यापेक्षा गाणं ऐकून एकांतात रडू https://bit.ly/3F3xJTV
गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा https://bit.ly/3EGAyck
दोन लाख पत्रिका, महिलांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था; असा आहे जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट https://bit.ly/3idDQwa
*माझा कट्टा* : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर माझा कट्ट्यावर... आज रात्री 9:00 वाजता फक्त एबीपी माझावर!
*डिजिटल स्पेशल* : निखिल खडसे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं? https://www.youtube.com/watch?v=SojSXhm-mjo
*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv