दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. असली आ रहा है नकली से सावधान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसेनेचे अयोध्येत पोस्टर्स, तर अयोध्या दौऱ्यावर प्रवक्ते सोडून इतर कुणालाही भाष्य करण्यास राज ठाकरेंची मनाई
2. डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज नवनीत राणा काय बोलणार याकडे लक्ष, काल फडणवीस आणि शेलारांनी लीलावती रुग्णालयात घेतली नवनीत राणांची भेट
3. मुंबई पालिकेच्या 'सर्वांसाठी पाणी' धोरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, तर 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार, उद्धव ठाकरेंचा इशारा
4. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात पुरातत्व विभागाच्या पथकाकडून आढावा, वज्रलेप निघालेल्या रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यानं अत्याधुनिक उपकरणाद्वारे पाहणी
5. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नाशिकच्या गंगापूर धरणातल्या पाणीसाठ्यात घट
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 08 मे 2022 : रविवार
6. पालघरच्या बोईसरमध्ये दोन युनियनमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी, सध्या तणावाचं वातावरण, शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात
7. आंतरजातीय विवाह केल्यानं विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले, नाशकातल्या इगतपुरीमधल्या रायांबे ग्रामपंचायतीचा आणि जातंपचायतीचा अजब फतवा
जातपंचायतीच्या (Jat Panchayat) जाचाची अनेक प्रकरणं आपण ऐकून असाल. पुरोगामी म्हणवल्या महाराष्ट्रात आज 21 व्या शतकात देखील असे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमधून (Nashik) समोर आला आहे. आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले आहेत. नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा काढला आहे. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावात ही खळबळजनक घटना आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक संस्थांकडून या प्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे. आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेकडून ग्रामपंचायत आणि जात पंचायत सदस्यांनी लाभ नाकारण्याचा अर्ज बळजबरीने लिहून घेतला. ठाकर समाजातील तरुणीने अनुसूचित जातीच्या मुलाशी विवाह केल्याने अर्ज लिहून घेतला आहे.
8. मुंबईलगतच्या डोंबिवलीत पाणीटंचाई जीवावर बेतली, कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, संदप गावातील गायकवाड कुटुंबावर शोककळा
9. रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर अनुभवता येणार झीप लाईनचा थरार, 84 फूट उंचीवरुन न्यायाहळता येणार निळाशार समुद्राचं सौंदर्य
10. 'धर्मवीर' चित्रपटाच्या ट्रेलरचं मुख्यमंत्री आणि सलमान खानच्या हस्ते लॉन्चिंग, तर आनंद दिघे समजून घेण्यासाठी चित्रपट पाहा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन