दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
१. राज्यातले मंत्री, आमदार आणि खासदारांची लाखोंची वीजबिले थकीत, ऊर्जा विभागाकडून यादी जाहीर, नव्या यादीत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही
२. रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी पुणे पोलीस आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार, अमजद खान नावाने पटोलेंचा फोन टॅप झाल्याची माहिती
Phone Tapping Case : रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणात आज पुणे पोलीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा जबाब नोंदवणार आहेत. अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं होतं. बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांवर आरोप आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस (Pune Police) आज मुंबईत येऊन नाना पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावानं नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळील नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देण्यात आला होता. यानंतर एबीपी माझानं (ABP Majha) हे प्रकरण उघड केल्यानंतर विधानभवनात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. याचप्रकरणी आज दुपारी 12 वाजता नाना पटोले यांचा जबाब पुणे पोलीस मुंबईत नोंदवणार आहेत
३. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची आज बैठक, पुढची रणनीती ठरवण्यासाठी खलबतं
४. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अयोध्येत, काल मथुरेत दर्शन घेतल्यानंतर आज श्रीरामाच्या नगरीत दर्शन घेणार
५. पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्णता वाढल्यामुळे नाशिकच्या गंगापूरसह विविध धरणातील पाणीसाठ्यात घट, पाणीकपातीची टांगती तलवार
६. नवी मुंबईतील आगीचा आठ तास थरार, दोन कामगार बेपत्ता, तीन जखमी
७. रोहित पवार तीर्थयात्रेला; विविध धार्मिक स्थळांच्या भेटी; राजस्थाननंतर सहकुटुंब यूपीत पोहोचले
८. रांचीमध्ये आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित वीस ठिकाणांवर ईडीचे छापे, तब्बल 19 कोटींची रोकड जप्त, नोटांचं घबाड पाहून अधिकारी चक्रावले
९. नागपूर-उमरेड मार्गावर भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू, भरधाव तवेरा कारची ट्रकला धडक
१०. डॅनिअल सॅम्सने सामना फिरवला, रोमांचक सामन्यात मुंबईचा गुजरातवर पाच धावांनी विजय, साहा-गिलची खेळी व्यर्थ