दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. औरंगाबादमधील लेबर कॉलनी जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु, 338 घरांवर चालणार बुलडोझर परिसरात जमावबंदी लागू
Aurangabad Labor Colony News : औरंगाबादच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसहापासून ही पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी 338 घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलीस आणि दीडशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पाडकाम कारवाईसाठी 50 जेसीबीसह अनेक कामगारांना पाचारण करण्यात आलं आहे. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडला आबे. तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र तरीही काही नागरिक इथं राहत असून त्यांनी या पाडकामाला विरोध केला आहे. ही मोडकळीस आलेली घरं पाडताना काही गोंधळ सदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी सहापासूनच ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.
2. 17 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करा, राज्य निवडणूक आयोगाचे 14 महापालिका आयुक्तांना निर्देश
3. राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीनं भाजपला साथ दिल्यानं नाना पटोलेंचा हल्लाबोल
4.संभाजीराजे छत्रपतींना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यापासून रोखल्यानं वाद, मंदिर प्रशासनाकडून पत्रक काढत दिलगिरी व्यक्त
5.आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मनसे पदाधिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईवरुन राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नसल्याचा इशारा
6. चंद्रपुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह 5 कर्मचाऱ्यांना डांबलं
7. 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग; IMD कडून इशारा; आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरीतील काही भागांसाठी 'रेड अलर्ट'
8. 12-14 वर्षे वयोगटातील 3 कोटींहून अधिक मुलांना मिळाला लसीचा पहिला डोस, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
9. श्रीलंकेत रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश, अराजकता कायम, राजपक्षे परिवार भारतात आश्रयाला येण्याच्या वृत्ताचं खंडन
10. यंदाच्या आयपीएल मोसमातलं प्ले ऑफचं पहिलं तिकीट गुजरात टायटन्सला, राशिद खानच्या फिरकीपुढे लखनऊचं अक्षरशः लोटांगण