दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या टेंभीनाक्यात देवीच्या आरतीसाठी रश्मी ठाकरे जाणार, शिंदे आणि ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आमनेसामने येण्याची शक्यता


ठाण्याच्या टेंभी नाका (Thane Tembhi Naka) इथली देवी यावर्षी सर्वात जास्त चर्चेत आहे आणि याचे कारण देखील शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेली उभी फुट हेच आहे. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या टेंभी नाका इथल्या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व त्यासाठीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. 1978 सालापासून या उत्सवाची सुरुवात स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी केली. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे. 


2. कोरोना काळात वाहन खरेदीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीचा आरोप, 'माझा'च्या बातमीनंतर उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, माजी मंत्री वडेट्टीवारांचा पलटवार


3. किरकोळ बाजारात कोथिंबीरची जुडी 200 रुपयांच्या घरात,  भाजीपाला महागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला भार


सर्वच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये (Nashik) 'भाव' खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत ( vegetables rates hike) वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला आहे.
 
आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत.


4. परतीच्या पावसाचं मराठवाड्यात धुमशान, अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान


5. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास होणार, मुंबईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 29 सप्टेंबर 2022 : गुरुवार 



6. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या नावाने फेसबुकवर मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी, ठकसेनाविरोधात ठाण्यातील भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा


7. आगामी पालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कुणालाही मिळण्याची शक्यता कमी, निवडणूक आयोगाला चिन्हाचा निर्णय घ्यायला तीन ते चार महिने लागण्याची शक्यता


8. पीएफआयनंतर आरएसएसवर बंदी घाला, काँग्रेसनंतर आता राजदचे लालूप्रसाद यादव यांची मागणी, मागणी करणाऱ्यांना फडणवीसांनी फटकारलं


9. पीएफआयवरच्या बंदीवरुन ओवैसींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, तर मिर्ची लागलेल्या पाकिस्ताननंही उचलली तळी, संयुक्त राष्ट्रात मुद्दा उपस्थित करणार


10. दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या टी-20 मालिकेत भारताची विजयी सुरुवात, 8 गडी राखून पाहुण्यांचा दारुण पराभव