1.राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीची काच फुटून सोमय्या जखमी 


2.शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव, माझ्या नावाने खोटा FIR लिहिला, किरीट सोमय्यांचा आरोप


kirit Somaiya Maharashtra Mumbai Latest News Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ केला.पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, त्यांनी माझ्या नावाने खोटा FIR लिहिला असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला आहे. तर पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव असल्याची टीका सोमय्यांनी केली. हा मला जीवे मारण्याचा तिसरा प्रयत्न आहे. आधी वाशीम नंतर पुणे आणि आता मुंबईत. 50 पोलिस असताना शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त काय करत आहेत? इतक्या प्रमाणात शिवसेनेचे लोक पोलिस स्टेशन परिसरात कसे आले? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी केले आहेत.


दरम्यान पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आम्ही FIR दाखल केला आहे. त्यानुसार पुढील तपास केला जाईल.


3.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर भाजप नेते आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी


4.काल जामीन नाकारणाऱ्या राणा दाम्पत्याला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर आज वांद्रे कोर्टात हजर करणार, राणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात तक्रार


5.राज ठाकरेंना महाराष्ट्र समजलाच नाही, कोल्हापुरातल्या सभेत शरद पवारांची टीका, तर भुजबळांकडून मनसे प्रमुखांची पिंजरा सिनेमातल्या मास्तरांशी तुलना


6.रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देणार, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा


7.कलम 370 मुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची काश्मीरात पहिलीच सभा, 20 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा करणार, तर संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्कारासाठी मोदी मुंबईत


8.पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, झाडे उन्मळून पडल्यानं सांगली-तासगाव रोडवरील वाहतूक ठप्प


9.मैदानात शतकांचा विक्रम ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरचं पन्नाशीत पदार्पण, मी 29 वर्षांचा अनुभव असणारा 20 वर्षाचा तरूण, मास्टर ब्लास्टरची प्रतिक्रिया


10.हैदराबादचा विजयी 'पंच', गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी, बंगळुरुवर 9 विकेट्स राखत मोठा विजय