1. राज्यसभेसाठी संभाजीराजे दुपारपर्यंत हातावर शिवबंधन बांधणार का याकडे लक्ष, शरद पवारांकडून शिवसेनापुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर 


Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे  रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे.  संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. 


2. देशभर ज्ञानवापीचा मुद्दा गाजत असताना पुण्यातल्या दोन दर्ग्यांबाबत मनसेचा मोठा दावा, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्गा, मनसेच्या अजय शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण


3. औरंगाबादमधल्या पाण्याच्या प्रश्नावरुन राजकीय घमासान, फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप रस्त्यावर उतरणार, मोर्च्यावरुन सेना-भाजपात बॅनरवॉर


4. नवनीत राणा मुंबई पोलीस आयुक्तांची संसदीय अधिकार समितीसमोर तक्रार करणार, अटकेत असताना अयोग्य वागणूक मिळाल्याचा आरोप


5.ओबीसी राजकीय आरक्षणासाठी पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, आक्रोश आंदोलनाचा इशारा, आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मविआमधल्या धुसफुसीवर खलबतं


6. केंद्रानं अबकारी करात कपात केल्यानंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलवरच्या व्हॅटमध्ये कपात, ठाकरे सरकारनं केलेली कपात कमी असल्याची भाजपची टीका


7. चंद्रपूरातील कळमना येथील वखारीला लागेलल्या आगीत 15 हजार टन लाकडाचा कोळसा, लगतच्या पेट्रोल पंपात इंधन नसल्यानं अनर्थ टळला


8. अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, कोचिंग क्लासेसच्या संचालकांविरुद्ध पॉस्कोचा गुन्हा 


9. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर, क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थिती, उद्या अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याशी चर्चा


10. थॉमस कप विजेत्या संघाची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, लक्ष्य सेनने गिफ्ट केली अल्मोडाची प्रसिद्ध 'बाल मिठाई'