दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उशीरा रात्री अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासह कोणत्या विषयावर खलबतं झाली याची उत्सुकता


2.  दसऱ्याला शिवाजी पार्कवर यंदा शुकशुकाटच राहण्याची शक्यता, शिवसेना आणि शिंदे गट दोघांना महापालिकेने परवानगी नाकरल्याची  माहिती, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष


शिवसेनेतील (Shiv Sena) सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेनं दोन्ही गटांना दिलेलं पत्र एबीपी माझाच्या (ABP Majha) हाती लागलं आहे. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला आता हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानंही हायकोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. शिवसेनेची याचिका दिशाभूल करणारी असल्याचा दावा शिंदे गटाकडून याचिकेत करण्यात आला आहे. 


3. महिनाभरात निवडणुका घेऊन दाखवण्याचं उद्धव ठाकरेंचं शाहांना आव्हान, बाप पळवणारी टोळी म्हणत बंडखोरांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री शिंदेंचाही पलटवार


4. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास, गद्दारांची लक्तरं दसऱ्याला काढणार, फडणवीसांची शेवटची निवडणूक ठरणार, ठाकरेंचा घणाघात


5. ठाकरेंना आता गटप्रमुख आठवले, शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर शिंदेंचा हल्लाबोल, बापाचा पक्ष, विचार विकणारी टोळी म्हणत शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 सप्टेंबर 2022 : गुरुवार



6. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचं आजपासून दोन दिवसीय मंथन, तर बुथ जिंका, मुंबई जिंका, शिवसेनेचा नारा


7. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पवारांच्या बालेकिल्ल्यात, बारामतीत कमळ फुलवण्यासाठी भाजपची विशेष रणनीती


8. अपहरणाचा कट रचणाऱ्या त्रिकुटालाच नोकरीची ऑफर, बुलढाणा अर्बन बँकेच्या राधेश्याम चांडक यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक


9. इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये मंदिरं पुन्हा निशाण्यावर, हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेत वाढ, परराष्ट्र मंत्री ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात


10.  भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार कामगिरी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सनी इंग्लंडचा पराभव, कर्णधार हरमनप्रीतची 143 धावांसह नाबाद खेळी, एकदिवसीय मालिका खिशात