दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. राज्यात उद्यापासून 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, औरंगाबाद, बीड, नगरसह 18 जिल्ह्यांना अलर्ट
 
2. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा तर गणेश मूर्तींच्या उंचीवर कुठलीही मर्यादा नसल्याचाही निर्णय


3. द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून अभिनंदन, मुंबईसह देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष


4. एकनाथ शिंदेंचं मिशन 200 फोल, राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 181 मतं, दोनशे मतं मिळाली नसली तरी भरपूर मतं मिळाली, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य


5. ज्यांना सर्व काही दिलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल  


6. बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटणार, कांदेंच्या मतदारसंघात आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा 


Aaditya Thackeray Melava : शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) निवेदन देणार आहेत. सुहास कांदे शिंदे गटात सामील झाले आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात म्हणजेच मनमाडमध्ये (Manmad) आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन मनमाडला जाणार आहेत. याबाबत मनमाडमध्ये होर्डिंग देखील लावले आहेत. 'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरुन शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख या निवेदनात असणार आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघार्षानंतर आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.  यासाठी त्यांची शिव संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. 21 ते 23 जुलै असा या यात्रेचा कालावधी असून ही यात्रा भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी अशी असणार आहे. काल ही यात्रा भिवंडीत होती. त्यानंतर इगतपुरी आणि नाशिक इथे मेळावा झाला. आज मनमान इथे त्यांचा मेळावा होणार आहे.


7. उपराष्ट्रपती निवडणुकीआधीच विरोधकांमध्ये फूट, ममता बॅनर्जी यांचा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय, विश्वासात न घेतल्याचा तृणमूलचा आरोप


8. पानसरे हत्येचा तपास अहवाल द्या: हायकोर्ट; तपास एटीएसकडे देण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत मुदत


9. आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची स्थगिती शिंदे सरकारनं उठवली, शिंदे-फडणवीस सरकारवर आदित्य ठाकरेंचा निशाणा, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांचाही पलटवार


10. अमेरिकेतील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राची कमाल, ८८.३९ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत धडक, रविवारी होणार अंतिम सामना