1. शिवाजी पार्कचा निर्णय प्रलंबित ठेवल्यानं शिवसेना जी-नॉर्थ वॉर्ड ऑफिसवर धडकणार, तर बीकेसीतील कॅनरा बँकेजवळील मैदान खासगी कंपनीनं आरक्षित केल्यानं सेनेची पंचाईत


दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार सामना सुरु आहे... शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. असं असताना बीकेसी मैदानाची लढाई शिंदे गटाने जिंकलीय. दसरा मेळाव्यासाठी बीकेसीमधील एक मैदान शिंदे गटाने आरक्षित केलंय. तर बीकेसीतील कॅनरा बँकेजवळील दुसऱ्या मैदानासाठी ठाकरे गटाने केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय.. कारण हे मैदान कॉलिन्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मैदान बुक करण्यात आलंय.. या कंपनीच्या मागणीमुळे शिवसेनेचा पर्याय हुकल्याचं बोललं जातंय... या कंपनीचं शिंदे गटाशी काही कनेक्शन आहे का याच्याही चर्चा आता रंगू लागल्यात...दुसरीकडे शिवसेनेनं आता शिवाजी पार्क मैदानासाठी आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतलाय. परवानगी मिळाली तर ठीक अन्यथा थेट शिवाजी पार्कात मेळावा घेण्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केलाय.. तसंच पालिकेनं या संदर्भात २४ तासात निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचं शिष्टमंडळ आज सकाळी पालिकेच्या जी-उत्तर कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क कुणाला मिळणार याकडं लक्ष लागलंय... 


2. भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर अशोक चव्हाणांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता, तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शशी थरुर उतरणार


काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 


3. सोशल मीडियावर लहान मुलं चोरणाऱ्या टोळीसंदर्भात फेक व्हीडिओचा पूर, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आव्हान, गैरसमजुतीतून अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना


4. पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग, पार्सल दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं घेतलं तरुणीचं चुंबन, डिलिव्हरी बॉय अटकेत


5.उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा बंद पाडला; औरंगाबाद शहरवासियांवर पाणी जपून वापरण्याची वेळ


6.समोरुन पाहिलं तर शिवसेना संपर्क कार्यालय अन् मागे सट्ट्याचा अड्डा; जळगावातील धक्कादायक प्रकार उजेडात 


7.सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार, यंदा भारतातून साखरेची निर्यातही वाढणार


8.कोरोनाकाळातील मास्क सक्तीच्या दंड वसूली कोणत्या कायद्यानुसार? मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल


9. राजकीय पक्षांना 2 हजारापेक्षा अधिकच्या देणगीचा हिशेब ठेवण बंधनकारक करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं विधी खात्याला पत्र


10. टी-20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडिया गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार, आजपासून तीन सामन्याच्या मालिकेला सुरुवात