दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



1. राज्यातील 16 जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल, सत्तांतरानंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष 


Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झालं. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत. राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे.  पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार  आहे. दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे काल प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.


2. आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार, हवामान विभागाची माहिती तर जोरदार पावसामुळे प्रमुख धरणांमधून विसर्ग
 
3. पक्ष वाढवण्यासाठी प्रस्थापितांशी लढावं लागेल, नागपुरात राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र, काल गडकरींची भेट घेतल्यानंतर आज बावनकुळेंना भेटणार
 
4. लवकरच वन नेश वन चार्जरचा नियम येण्याची शक्यता, ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून समिती गठीत
 
5. गड किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा तर देशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नीती आयोगाची स्थापना करण्याचा मानस
 
6. मुंबईलगतच्या नालासोपारामधून मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक, 15 लाखांचं बक्षीस असलेला नक्षली कारू यादव एटीएसच्या ताब्यात


7. पुण्यात शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात; कंटेनर चालकाचा मृत्यू, बस चालकासह प्रवासी जखमी


8. मोहालीच्या व्हिडीओकांडप्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आरोपी विद्यार्थिनीसह दोन तरुणांनाही अटक, पंजाब पोलिसांची कारवाई


9. महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांना आज अखेरचा निरोप, देशातील प्रमुख नेते अंत्ययात्रेत सहभागी होणार, माझावर विशेष कव्हरेज


10. एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा शानदार विजय; इंग्लंडचा सात विकेट्सनं पराभव, स्मृती मानधनाची झंझावाती खेळी