दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा मैदानात, मुर्मूंसाठी 200 मतं मिळवून देण्याचा शिंदे गटाचा निर्धार
2. आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात, अग्निपथ योजना, असंसदीय शब्दांची यादी, ईडी कारवाई आणि महागाईवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती
3. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासाठी 20 जुलै निर्णायक दिवस ठरण्याची शक्यता, आमदार अपात्रतेसंदर्भातील दोन्ही बाजूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
4. किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोळी बांधवांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
5. राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, हजारो नागरिक बेघर; 104 जण दगावले, चंद्रपूर, गडचिरोलीतला पूर ओसरण्यास सुरुवात
Maharashtra Rain : राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे.
6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दणका, नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती
7. लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची टोलेबाजी
8. आजपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, पॅकिंग केलेले धान्य, दुग्धजन्य पदार्थ, स्टेशनरी आणि अन्य गोष्टी महागणार
9. पंढरपुरातील श्री विठ्ठल आश्रममधील 40 जणांना अन्नातून विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
10 . 8 वर्षांनी टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये एक दिवसीय मालिकेत विजय, अखेरच्या सामन्यात रिषभ पंतचं शानदार शतक तर हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी