दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र येणार असल्याचं समजल्यावर बरे वाटले, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचं ट्वीट, मध्यस्थी केल्याबद्दल मानले भाजपचे आभार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट केलं आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद देखील दिपाली सय्यद यांनी मानले आहेत. दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
2. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपला, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या राऊतांना शेलारांचं प्रत्युत्तर, 12 मंत्र्यांच्या कॅबिनेटची मागणी करताना राऊतांचं संविधानावर बोट
3. सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नक्वींचं नाव चर्चेत असताना उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनगड यांना संधी, तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 200 मतं मिळवून देण्याचा शिंदेंचा निर्धार
4. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा नवा मुहूर्त, 15 ऑगस्टला नागपूर-शिर्डी टप्प्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
5. पावसाचा जोर ओसरल्यानं पूरग्रस्त भागांना काहीसा दिलासा, चंद्रपुरात पुराचं पाणी ओसरलं, मात्र गडचिरोलीत अनेक ठिकाणी अद्याप पुराचं पाणी कायम
6.नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणात सहभागी आंदोलकांवरील केसेस काढून टाका, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
7.मुंडे बहिण-भावात श्रेयवादावरुन जुंपली, परळीसाठी 100 कोटींचा निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दोन्ही बाजूंकडून दावा
8. राखमिश्रीत पाण्याचा पुरवठा रोखण्याचं नागपुरातील प्रशासनासमोर आव्हान, काल कोराडी वीज प्रकल्पाच्या खासाळा तवाचा बांध फुटल्यानं लाखो टन राख पाण्यात
9.आज नीट यूजी परीक्षा, परीक्षा केंद्रांवर कोविड नियमांचं पालन; तर आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही आज
10. भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील आज अखेरचा सामना, टी-20नंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचीही भारताला संधी