दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. एससीओ (SCO) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये दाखल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेणार भेट


2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज अनावरण, मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडणार कार्यक्रम


3. राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.


4. कोल्हापुरात अंबाबाईच्या रांगेविना दर्शनासाठी 200 रुपयांचा पास, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध


नवरात्रौत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही, अशा भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केली आहे. पेड ई पासची किंमत माणसी 200 रुपये असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. मात्र, पेड दर्शन असू दे, पण व्हीआयपी दर्शनाला भाविकांनी विरोध केला आहे.


5. पुण्यात सेक्स तंत्र नावाच्या कोर्सची जाहिरात व्हायरल, नवरात्रीत तीन दिवसाच्या कोर्सचं आयोजन, अनेक राजकीय आणि धार्मिक संघटनांकडून विरोध


6. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर, निष्ठा यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद


7. सलमान खानच्या हत्येचा चार वेळा प्रयत्न, नवी मुंबईतील फार्महाऊसजवळ घात करण्याचा होता कट, तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँच पंजाबमध्ये


8. गंगापूरमधून विसर्ग वाढल्यानं गोदावरीच्या पातळीत वाढ, काठालगतच्या रहिवाशांना इशारा, अनेक जिल्ह्यात संततधार 


9. नवी मुंबईतील शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह 300 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश


10. इंग्लंडकडून भारताचा सात गडी राखून पराभव, तिसरी महिला टी-20 मालिका जिंकली


ब्रिस्टल येथे भारतीय महिला संघाचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना इंग्लंड महिला टीमसोबत रंगला. यावेळी इंग्लंडने भारतावर मात करत तिसरी महिला टी-20 मालिका जिंकली. इंग्लंडने (126/3) भारताचा (122/8) 7 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाने T20 हा सामना जिंकला होता. मात्र काल रात्री उशीरा झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर मात करत तिसरी महिला टी-20 मालिका जिंकली.